|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » डीएसकेंना कुठल्याहीक्षणी अटकेची शक्यता, 22 फेब्रुवारीला अंतिम निर्णय

डीएसकेंना कुठल्याहीक्षणी अटकेची शक्यता, 22 फेब्रुवारीला अंतिम निर्णय 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झालेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी 50 कोटी भरण्यास अपयशी झाल्याने डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण आजपासून दूर करण्यात आले असून 22 फेब्रुवारीला अंतिम निर्णय देणार असल्याचे हायकोर्टाने आज झालेल्या सुनावणीत म्हटले आहे.त्यामुळे डीएसकेंना कुठल्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले. काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने डी. एस .कुलकर्णी यांना फटकारत काहीही करा, भीग मागा पण गुंतवणुकदारांचे पैसे कधी देणार आहात याची माहिती द्या ,असे सांगितले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणी डीएसकेंनी केवळ कोर्टाची दिशाभूल केली आहे त्यांच्याकडे एकच पासपोर्ट असेल कशावरून ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांचा पासपोर्ट तातडीने जप्त  करा असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. तसेच डीएसकेंना अटकेपासन दिलेले संरक्षण हायकोर्टाने काढून घेतले असून 22 फेबुवारीला अंतिम निर्णय देणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता डीएसकेंना कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

 

Related posts: