|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » विषारी गॅस गळतीमुळे कामगाराचा मृत्यू

विषारी गॅस गळतीमुळे कामगाराचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई

उल्हासनगर शहरातील शहाड परिसरातील सेंच्युरी रियॉन कंपनीत विषारी गॅस गळतीमुळे एका कामगाराचा जागीच गुदमरून मृत्यू झाला आहे. तर अकरा कामगारांच्या नाकातोंडात विषारी गॅस गेल्याने त्यांना कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संजय शर्मा असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. सेंच्युरी रियॉन कंपनीत रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गॅस पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यामधून अचानक विषारी गॅसची गळती झाली. परंतु त्यावेळी कंपनीकडून सुरक्षेच्या दृष्टीने कामगारांना कोणत्याही प्रकराची सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा आरोप कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कंपनीच्या ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱयांना चार दिवसाचे काम एका दिवसात पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. अशी माहिती समोर आली आहे. यामुळे ही घटना घडल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Related posts: