|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘थिएटर ऑलिम्पिक’ महोत्सवात गोव्यातील 2 नाटक, 1 तियात्र

‘थिएटर ऑलिम्पिक’ महोत्सवात गोव्यातील 2 नाटक, 1 तियात्र 

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचे उद्गार

प्रतिनिधी/ पणजी

ve@Meveue स्कूल ऑफ्ढ ड्रामा नवी दिल्ली आयोजित ‘थिएटर ऑलिम्पिक’ या महोत्सवात 30 देशांचा सहभाग असून भारतातल्या 4000 संस्थांची निवड करण्यात आली. त्यात गोव्यातून ‘ब्लड वेडिंग’ हे कोकणी नाटक, ‘ओनी मिथ’ कोकणी तियात्र आणि ‘स्वप्नवासवदत्ता’ हे संस्कृत नाटक निवडण्यात आले आहे. भारतातून 450 संस्था योगदान देणार आहेत गोव्याचाही यात समावेश आसे उद्गार कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारपरिषदेत काढले.

यावेळी प्रेमानंद पोळे आणि जयंद्रनाथ हळदणकर उपस्थित होते. रविवार दि. 18 रोजी या महोत्सवाला प्रारंभ होणार असून रविवार दि. 8 एप्रिलपर्यंत हा महोत्सव सुरु असणार आहे. देशात एकूण 17 ठिकाणी याचे आयोजन केले आहे. रंगमेळ कला अकादमी गोवा प्रस्तुत ‘ब्लड वेडिंग’ हे कोकणी नाटक 20 रोजी ve@Meveue स्कूल ऑफ्ढ ड्रामा नवी दिल्ली येथे होणार आहे तर 24 मार्च रोजी भोपाल येथे भार्गवी थिएटर पर्वरी प्रस्तुत ‘ओनी मिथ’ कोकणी तियात्र आणि 23 मार्च रोजी गुहाटी येथे अभियाक्ती पणजीतफ्xढ ‘स्वप्नवासवदत्ता’ संस्कृत नाटक होणार आहे असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

‘ब्लड वेडिंग’चे लेखन फ्sढडेरिको लॉरका यांनी तर कोकणी अनुवाद डॉ. प्रकाश वझरीकर यांनी व दिग्दर्शन विष्णूपद बर्वे यांनी केले आहे. ‘ओनी मिथ’चे लेखन मेनिनो अर्वाजो व दिग्दर्शन जयंद्रनाथ हळदणकर यांनी केले. ‘स्वप्नवासवदत्ता’चे लेखन महाकवी बारसा व दिग्दर्शन अनघा देशपांडे यांनी केले आहे.

गोमंतकीय कलाकार आपला पूर्ण वेळ आपल्या कलेसाठी देत असल्याने कला व संस्कृती खात्यातफ्xढ त्यांना मिळणाऱया मानधनात वाढ करण्यात येईल. पेडणे येथे भगवती हायस्कूल पेडणे यांनी ‘शंभूराजे’ महानाटय़ाचा प्रयोग केला असून 13,500 लोकांची यावेळी उपस्थिती होती. वाघळे हायस्कूल मंगेशीच्या विद्यार्थ्यांनीही ‘गोमंत मुक्तगाथ’ हे महानाटय़ केले असून या दोन्ही माहानाटय़ांचे तीन प्रयोग करण्यात येणार आहे. 26 एप्रिल रोजी संखळे, 29 एप्रिल फ्ढाsंडा आणि 6 मे रोजी केपे येथे या दोन्ही नाटकांचे प्रयोग होईल. 10,000 आसनाची व्यवस्था करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पास तर इतरांना 50 ते 300 रुपयापर्यंत तिकिट आकारली जाणार अशी माहितीही यावेळी मंत्री गावडे यांनी दिली.