|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बिरदेव यात्रेचा दुसरा दिवस उत्साहात

बिरदेव यात्रेचा दुसरा दिवस उत्साहात 

वार्ताहर/ सडोली खालसा

  बिरोबाच्या नावाने चांगबलंचा गजर करत खोबरे भंडाराची उधळण करत वाशी (ता. करवीर) येथील सुरू असलेल्या बिरदेव त्रैवार्षिक जळयात्रेच्या दुसऱया दिवशी पहिला पालखी सोहळा व हेडाम नृत्य लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

    बिरदेवाची त्रैवार्षिक जळयात्रा सुरू असून गेले दान दिवस वाशीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्यातून भाविक मोठय़ा प्रमाणात दाखल झाले आहेत गावात यात्रा ठिकाणी मेवामिठाई, खेळणी, पाळणे, खाद्यपदार्थाच्या दुकानांनी परिसर व्यापून गेला आहे. शुक्रवारी रात्री देव भानूस देवालयातून मुख्य मंदीराकडे रवाना झाली. धनगरी ढोल गजरात रात्रभरानंतर पालखी पहाटे 4 वा. मुख्य मंदीरापाशी पोहचल्यानंतर  मांडीवरील मानाचे भरंगुडेच बकरे मांडीवर कृष्णा पुजारी यांनी धरले व अजित रानगे यांनी तोडण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर बिरू पुजारी यांनी भाकणुक केली. देव मुख्य मंदीरात नेण्यात आला.

  पहाटे 6 वाजलेपासून गावकऱयांनी नवसाचे दंडवत घेण्यात आले. दुपारी 3 वाजता गाव कामगार पाटील व हर्षवर्धन साळुखे यांच्या हस्ते पालखी पूजन करून पहिल्या पालखी सोहळय़ाला सुरवात झाली. हा पालखी सोहळा मुख्य मंदीरातून मंदीर परिसरातुन प्रदक्षिणा घालून मुख्य सदरीवर जवळ आले नंतर धनगरी ढोलांचा वादनाचा वालुग करण्यात आला. भाविकाची नवसाची मुले पालखीवर उधळण्याचा विधी संप्पन्न झाला. यानंतर भंडाऱयाच्या उधळणीत धनाजी बनकर              यांनी हेडाम खेळण्याचा विधी पार पाडला. मुडशिंगीचे गणपती पुजारी व वाशीचे भागोजी रानगे यांनी भाकणूक झाली व उशिरापर्यत रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सुरू होते, आज रविवार यात्रेचा दुसरा पालखी  सोहळा असून मानाचे कांडगाव व गावातील गाडे मंदिराकडे अंबिल घुगरीचा नैवद्य घेऊन मदिराकडे येतील.                                                                     

Related posts: