|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सांताप्रुझला पीडीएतून वगळा, अन्यथा आंदोलन

सांताप्रुझला पीडीएतून वगळा, अन्यथा आंदोलन 

प्रतिनिधी /पणजी :

ग्रेटर पणजी पीडीएला विरोध करून त्यातून वगळण्याची मागणी करण्यासाठी सांताक्रूझ सिटीझन समितीतर्फे सांताक्रूझ येथे काल रविवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच जाहीर सभा घेऊन ‘पीडीए नको’ म्हणून घोषणा देण्यात आल्या. मोर्चा तसेच जाहीर सभेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

 सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस आणि सरपंच मारीयाना आराऊजो यांनी पीडीएच्या समितीवरुन राजीनामा देत असल्याचे सभेत घोषित केले. सांताप्रुझला पीडीएतून न वगळल्यास रस्त्यावर उतरून पीडीए विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सभेतून देण्यात आला.

या मोर्चाला तसेच सभेला कुडका, बांबोळी-तळावली तसेच मेरशी, चिंबल, सांताक्रूझ पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी प्रकृती बरी नसतानाही सभेला उपस्थिती लावून पीडीएला विरोध दर्शवला तसेच 10 वर्षापूर्वी केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. जि. पं. सदस्य सबिना अराऊजो, कुडका सरपंच मारिया डिकुन्हा यांनीही पीडीएला विरोध करणारी भाषणे केली. रूडॉल्फ फर्नांडिस यांनी पीडीएला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

सांताक्रूझ चर्चकडून मोर्चा सुरु होऊन तो पुन्हा चर्चकडे येऊन जाहीर सभेत रूपांतरीत झाला. लोकांनी मेणबत्ती पेटवून त्यात सहभाग दिला. आमदार टोनी फर्नांडिस यांनी पीडीएवरील लेखी राजीनामा पत्र सभेतच सादर करून ते चर्चचे फादर अलेक्झांडर परेरा यांच्या स्वाधीन केले. सरपंच मारियाना अराऊजो हे सोमवारी राजीनामा पत्र देणार आहेत. लोकांना पीडीए नको हे या मोर्चातून-सभेतून स्पष्ट झाले आहे.

Related posts: