|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » वृद्ध दाम्पत्याने केली राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी

वृद्ध दाम्पत्याने केली राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी 

ऑनलाईन टीम /मुंबई

   मुंबईतील चर्नीरोडजवळच्या ठाकुर्लीमध्ये राहणाऱया एका वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. नारायण लवाटे व इरावती लवाटे अशी या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत.

   या दाम्पत्यांनी इच्छामरणाची मागणी राष्ट्रपतींकडे केली असता, त्यावर त्यांना कोणतेही उत्तर आलेले नसल्यामुळे हे दाम्पत्य स्वतःच्या हत्येची योजना स्वतःच आखत आहेत. माझ्या पतीला माझी गळादाबून हत्या करण्याची मुभा आहे. पत्नीला मारल्यानंतर पतीलाही मृत्यू दंडाची शिक्षा मिळेल, असे म्हणत स्वतःच्याच हत्येचे प्लॅनिंग तयार केले आहे. या दाम्पत्याचे वय हे 80 पेक्षा जास्त आहे. याशिवाय त्यांच्या मागे मुले वा कुटुंबात इतर कोणीही नसून, त्यांना कोणता आजार देखील नाही. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून, आम्ही आता सक्षम राहीलो नाहीत. असे या दाम्पत्याला वाटत आहे.

21 डिसेंबरमध्ये लवाटे दाम्पत्याने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली होती. 31 मार्च 2018 पर्यंत त्यांच्या उत्तराची वाट पाहू, असे पाठवलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. पत्र पाठवून दोन महिने झाले तरी यांच्या पत्राची दखल अजूनही घेतली गेलेली नाही. लवाटे दाम्पत्यांने एकमेकांना आयुष्यभर साथ दिली आहे. आता मृत्यू देखील सोबतच यावा अशी या दोघांनी इच्छा व्यक्त केली आहे.

 

Related posts: