|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अनगोळ येथे श्री करेव्वादेवी जत्रा महोत्सवाला प्रारंभ

अनगोळ येथे श्री करेव्वादेवी जत्रा महोत्सवाला प्रारंभ 

प्रतिनिधी/     बेळगाव

वाजंत्री गल्ली अनगोळ येथील श्री करेव्वादेवी पंच कमिटीच्यावतीने श्री करेव्वादेवी जत्रा महोत्सवाला मंगळवारी मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. तीन वर्षांतून एकदा पार पडणाऱया जत्रा महोत्सवाला भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली.

मंगळवारी सकाळी अनगोळच्या विविध भागातून बँड पथकासह भव्य प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. तसेच विविध मंदिरांतील देवींच्या ओटय़ा भरण्यात आल्या. तसेच सायंकाळी संग्या बाळय़ा हे नाटक सादर करण्यात आले.

बुधवार दि. 21 रोजी सकाळी 10 ते 1 वा. श्री लक्ष्मी ब्राँस बँड कंपनी, (हरिपूर ता. मिरज, जि. सांगली) व दरबार ब्राँस बँड कंपनी (लेंगरेगाव, ता. मिरज. जि. सांगली) यांच्या बँड पथकांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी भांदूर गल्ली, अनगोळ येथील यल्लाम्मा देवस्थानपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Related posts: