|Thursday, November 21, 2019
You are here: Home » उद्योग » बजाज अलायन्झची ‘लाइफ गोल अश्युअर’ योजना

बजाज अलायन्झची ‘लाइफ गोल अश्युअर’ योजना 

पुणे / प्रतिनिधी :

बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.कडून मूल्यसंकुलावर ‘बजाज अलायन्झ लाइफ गोल अश्युअर’ योजना जाहीर करण्यात आली आहे. नवीन सुविधा असलेली ही युलिप योजना ग्राहकांना गुंतवणूक लाभ देणारी असून, ती जीवनकवच पुरविणारी आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ म्हणाले, आम्ही सादर केलेली नवीन योजना विमा क्षेत्रामध्य नवीन पायंडा निर्माण करणारी ठरेल. हल्लीच्या काळातील गुंतवणूकदारांची आयुष्यातील उद्दिष्टपूर्तीची व्याख्या बदलली आहे. असे गुंतवणूकदार विश्वासार्ह संस्थांनी सादर केलेल्या योजनांच्या प्रतीक्षेत आहेत. आजच्या काळातील गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण होतील, अशी आमची ही नवीन योजना आहे. पॉलिसी संपल्यानंतर ज्या ग्राहकांना हप्त्यात लाभ हवे असतील, त्यांना पुढील पाच वर्षांत रिटर्न इनहान्सरपोटी ठरलेल्या हप्त्यांमध्ये 0.5 टक्के अधिक रकमेची भर पडेल. या कालावधीदरम्यान ग्राहकांचे फंड मूल्य त्यांच्या इच्छेनुसार फंडाशी संलग्न राहील.

Related posts: