|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पेरूमध्ये बस दरीत कोसळून 44 जण ठार

पेरूमध्ये बस दरीत कोसळून 44 जण ठार 

लीमा :

पेरूच्या अरेक्विपा येथे एक बस दरीतील नदीत कोसळली असून या दुर्घटनेत 44 जणांना जीव गमवावा लागला. तर 24 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील 3 मुलांसमवेत 7 जणांची स्थिती गंभीर आहे. ही दुर्घटना पॅन-अमेरिका महामार्गावर घडली आहे. पेरूमध्ये दोन महिन्यात ही दुसरी मोठी बस दुर्घटना आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात देखील बस नदीत कोसळल्याने 48 जणांचा मृत्यू झाला होता.

बस चाला येथून अरेक्विपा येथे जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध अधिकारी घेत आहेत. दुर्घटनेतील जखमींना हेलिकॉप्टरच्या मदतीने रुग्णालयात पोहोचविण्यात आले. पेरूचे राष्ट्रपती प्रेडो पाब्लो कुजिंस्की यांनी ट्विट करत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. पेरूमध्ये अनेक महामार्ग हे पर्वतरांगेतून जात असल्याने दरीत वाहने कोसळण्याच्या दुर्घटनांचे प्रमाण येथे अधिक आहे.