|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हल्लाबोल आंदोलनातून सर्जेकोटवासीयांची माघार

हल्लाबोल आंदोलनातून सर्जेकोटवासीयांची माघार 

प्रतिनिधी /मालवण :

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलंय झोपेचे सोंग. त्यांना कुणीतरी झोपेतून उठविण्याची गरज निर्माण झाली आहे. केसरकर जिल्हावासीय म्हणून मच्छीमारांच्या लढय़ात सहभागी न झाल्याची खंत वाटते. शिवसेनेकडून मच्छीमारांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. शांततेच्या मोर्चातही मच्छीमार सहभागी होऊ नयेत म्हणून शिवसेनेच्या अदृश शक्ती काम करीत होत्या. सर्जेकोट पंचक्रोशीतील रेवंडी, कोळंब, हडी तसेच मालवणातील अनेकांनी आम्हाला साथ दिल्याने आम्ही लढा यशस्वीपणे उभा केला. मात्र, आता कायदा हातात न घेता सनदशीर मार्गाने शासन यंत्रणेला जागे करणार आहोत, असे सर्जेकोट बंदर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मच्छीमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी समस्त सर्जेकोटवासीयांतर्फे सांगितले. सर्जेकोटवासीय मोठय़ा संख्येने जेटीवर उपस्थित होते. गावाने  गोपीनाथ तांडेल यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. सुमारे 150 मच्छीमार उपस्थित होते.

पालकमंत्री आले नाहीत पण नारायण राणे तात्काळ धाऊन आले. आमचे दु:ख हलके केले, आधार दिला. नीलेश राणे यांनी मालवणात तळ ठोकून मच्छीमारांच्या लढय़ासाठी मोर्चा काढला. पालकमंत्र्यांप्रमाणे शिवसेनेच्या आमदार, खासदारांकडूनही मच्छीमारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शासन यंत्रणेनेही असहकार्य केले. पारंपरिक मच्छीमारांना खोटय़ा गुन्हय़ात अडकविले जात असल्याने हल्लाबोल आंदोलन थांबविण्यात येणार आहे. शिवसेना, भाजपचे विधीमंडळात संख्याबळ पुरेसे आहे. त्यांनी विधीमंडळात मच्छीमारांच्या समस्या मांडून कायद्यात बदल करून घ्यावा, अशीही मागणी तांडेल यांनी केली आहे.

Related posts: