|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लाडक्या राजाच्या वाढदिवसासाठी राजधानी सजली

लाडक्या राजाच्या वाढदिवसासाठी राजधानी सजली 

प्रतिनिधी/ सातारा

सातारचे लोकप्रिय खासदार व राजधानी साताराचे जाणते राजे श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या 51 व्या वाढदिनानिमित्त राजधानी सातारा सजली आहे. लाडक्या राजाला दिर्घायुष्य चिंतण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसागर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आतुर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्टवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांसह दिग्गज नेतेमंडळी उदयनराजेंना शुभेच्छा देण्यासाठी साताऱयात डेरेदाखल झाले आहेत.

  आजपर्यंत कधीही एवढा भव्य दिव्य वाढदिवस उदयनराजे प्रेमींनी केला नव्हता. यंदा मात्र सर्व गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक करणारा व रथी-महारथींच्या उपस्थितीत उदयनराजेंचा 51 वा वाढ†िदवस राजेशाहीला साजेशा थाटात साजरा होणार आहे. रात्री 12 वाजल्यापासून फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली होती. जणु काही रात्री पासून राजधानी आपल्या लाडक्या राजाला शुभेच्छा देण्यासाठी आतुर झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. तरुणाईने विविध ठिकाणी रात्रीच केक कापून हॅप्पी बर्थडे महाराज, एकच राजे उदयनराजे अशा घोषणांनी शाहुनगरी दुमदुमून टाकलेली दिसत होती. विविध ठिकाणी लावलेल्या फ्लेक्सने राजधानी सातारा उदयनराजेमय होऊन गेलेली दिसत होती.

 सातारचे लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस राजेशाहीथाटात आज शनिवार दि. 24 रोजी साजरा होत आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कोटय़वधींच्या विकासकामांचे भुमिपुजन दिवसभर होणार असून सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे. यामध्ये सातारकरांचा जिव्हाळय़ाचा समजला जाणारा कास भिंती उंचीच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना जास्त वेळ नसल्याने कासला न जाता सभास्थानावरच प्रतिकात्मरित्या कास भिंतीचे भुमिपूजन उरकण्यात येणार आहे. तसेच कासच्या रस्ता चौपदरीकरणाचा भुमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सातारकरांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पोवईनाक्यावरील गेड सेप्रेटर, नगपालिका प्रशासकिय कार्यालयाचे भूमिपूजन, शहरातील भुयारी गटर योजना आदी कोटय़वधींच्या विकासकामांचे भूमिपूजन उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आहे.

त्यानंतर सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य नागरी सत्कार होणार आहे.

विविध मंत्री अन् मान्यवरांची मांदियाळी

 या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयबापू शिवतारे, कृषी व पवनराज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. विजयसिंह मोहिते पाटील, श्रीमंत शिवाजीराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभुराज देसाई, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, आ. नरेंद्र पाटील, आ. मोहनराव कदम, आ. आनंदराव पाटील, राष्ट्रसंत भैय्युजी महाराज, भारत फोर्ज लि.चे बाबासाहेब कल्याणी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, हिंदुराव नाईक निंबाळकर, माजी खासदार गजानन बाबर, माजी आमदार विलास पाटील उंडाळकर, विक्रमसिंह पाटणकर, मदनदादा भोसले, कांताताई नलावडे, डॉ. दिलीप येळगावकर, सदाशिव सपकाळ, प्रभाकर घार्गे, विठ्ठल रुक्मिणी समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, शिवसेने उपनेते नितिन बानुगडे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, रिपाइं जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

खासदार उदयनराजे भोसले शनिवारी दिवसभर विकासकामांचे भूमिपूजन उरकुन दिग्गज नेतेमंडळींच्या शुभेच्छा सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद मैदानावर स्वीकारल्यानंतर रात्री 8 वाजल्यानंतर जलमंदिर येथे उदयनराजे भोसले नाग†िरकांच्या शुभेच्छा स्वीकारणार असल्याचे खा.श्री.छ. उदयनराजे भोसले मित्रसमुह, राजधानी, सातारा यांनी कळविले आहे. तसेच सातारकरांनी मोठय़ा संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related posts: