|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » खा. दिलीप गांधी आणि मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल

खा. दिलीप गांधी आणि मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

भाजप खासदार दिलीप गांधी यांच्यासहीत  त्यांचा नगरसेवक मुलगा सुवेंद्र गांधीवर खंडणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून सीआयडी चौकशीचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबद खंडपीठाने दिले होते.

हायकोर्टाच्या खंडपीठाने नगरच्या शोरुम मालकाच्या याचिकेवर आदेश दिले आहेत. या प्रकरणी फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर अपहरण, खंडणी आणि कट रचल्याप्रकरणी भूषण बिहाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण बिहाणी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.