|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव होणार

ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव होणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऍपल या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी चार दशकांपूर्वी म्हणजेच1973मध्ये एका कंपनीला पाठवलेला बयोडेटाचे पुढील महिन्यात लिलावात होणार आहे.सध्या त्या बायोडेटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, या बायोडेटामध्ये अनेक ठिकाणी स्पेलिंग आणि विराम चिन्हे यांच्या प्रचंड चुका या बायोडेटामध्य आहेत. तसेच हा बायोडेटामध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांचे नावही स्टीव्हन असे लिहले होते. तसेच ऑरेगन ऐवजी रीड असेही लिहले होते. एवढेच नाही तर बायोडेटामध्ये कॅलफोर्नियाच्या कंपनीत हेवलट पॅकर्डचे नाव चुकून हेविट पॅकर्ड असे लिहले होते. या अर्जात जॉब्स यांनी कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे हे देखील नमूद करण्यात आले नव्हते. त्यांच्या बायोडेटाचा लिलाव 8 ते 15मार्च दरम्यान होणार आहे.

 

Related posts: