|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » व्यापारात अमेरिकेला संपवतोय चीन : ट्रम्प

व्यापारात अमेरिकेला संपवतोय चीन : ट्रम्प 

वॉशिंग्टनः

चीनसोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा इशारा दिला. व्यापाराबद्दलच्या वादावर दोन्ही देशांचे संबंध बिघडू शकतात, चीन या मुद्यावर अमेरिकेला संपवू पाहत असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प प्रशासनाने चीनच्या विरोधात कठोर कारवाईची धमकी दिली आहे. यात आर्थिक दंड, निर्बंध इत्यादी मार्गांचा समावेश असणार आहे. अमेरिका आणि चीनदरम्यान अलिकडच्या काळात तणाव वाढला आहे. अमेरिकेसोबत चीनची व्यापार बचत 275.8 अब्ज डॉलर्स नोंदविण्यात आली आहे. चीनसोबतच्या व्यापारातील तूट कमी करण्याच्या ट्रम्प यांच्या लक्ष्याला छेद देणारा हा आकडा आहे. चीनसोबत चांगले संबंध विकसित केले आहेत, परंतु चीन आमच्या व्यापाराला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहे. ते अमेरिकेच्या व्यापारालाच संपवू पाहत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी जॉइंट व्हाइट हाउस परिषदेत केला. क्षी जिनपिंग यांच्यासोबत व्यक्तिशः अत्यंत चांगले संबंध आहेत. जिनपिंग माझ्या पसंतीचे व्यक्ती आहेत. ते चीनला तर मी अमेरिकेला पसंत करतो. या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असल्याने पुढील काळ खूपच रंजक ठरणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेच्या प्रशासनाला चीनसोबतचा व्यापार संतुलित करण्याची गरज आहे. चीनसोबत होणाऱया व्यापारातील तूट सध्या प्रचंड प्रमाणात आहे. चीन दिवसेंदिवस बलशाली होत आहे, अमेरिकेच्या कमकुवत नेतृत्वामुळे चीनने मोठी रक्कम जमविली आहे. चीनसोबतचे व्यापारी संबंध देखील वृद्धिंगत होऊ शकतात, येणारा काळच चीनसोबतच्या संबंधांची दिशा ठरविणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

Related posts: