|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डंपिंग ग्राऊंडवर होणार आज न.प.ची सभा

डंपिंग ग्राऊंडवर होणार आज न.प.ची सभा 

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

न. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या छप्पराचे काम सध्या सुरू असल्याने न. प. ची सर्वसाधारण सभा सोमवारी 26 रोजी कॅम्प येथील स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (डंपिंग ग्राऊंड) येथे होणार आहे.

पूर्वी शहरातील सर्व कचरा, मृत जनावरे रामघाट रोडवरील डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकली जायची. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात यायचे. परिसरात दुर्गंधी पसरायची. त्यामुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी यायच्या. रामदास कोकरे हे मुख्याधिकारी म्हणून आल्यानंतर त्यांनी या परिसराचे रुपच पालटून टाकले. त्यांना नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांनी सहकार्य केले. शहरातील सर्वकचरा या डंपिंग ग्राऊंडवरच टाकला जातो. मात्र या कचऱयावर लगेच प्रक्रिया करून बायोगॅस, गांडुळ खत, कांडी कोळसा आदी बनविण्यात येते. त्यामुळे हे डंपिंग ग्राऊंड स्वच्छ पर्यटन स्थळ बनले आहे.

नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपला वाढदिवस, नूतन वर्षाचे स्वागत आदी कार्यक्रम याच डंपिंग ग्राऊंड येथे आयोजित केले होते. जिल्हाधिकारी उदय चौधरी,  मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक श्रीकांत भारतीय यांनी या पर्यटन स्थळी भोजनाचा आस्वादही घेतला होता. त्यानंतर सोमवारी न.प. ची सभा होणार याच ठिकाणी होणार आहे.