|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आत्मनिर्भर बनावे

विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आत्मनिर्भर बनावे 

वार्ताहर/ धामोड

विद्यार्थ्यांनी परीक्षांचे दडपण न घेता खुल्या वातावरणात परीक्षा देऊन आत्मनिर्भर बनावे. शिवाय परीक्षांना सामोरे जाताना उचित ध्येय डोळय़ासमोर ठेवावे, असे आवाहन दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दिपसिंह नवणे यांनी केले.

न्यू इंग्लिश स्कूल धामोड (ता. राधानगरी) येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभप्रसंगी ते प्रमुख म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव किसन पोतदार होते.

स्वागत प्रभारी मुख्याध्यापक एस. बी. चरापले यांनी केले. प्रास्ताविक ए. बी. जोंग यांनी केले. प्रारंभी संस्थेचे संस्थापक, जि. प. चे माजी अध्यक्ष स्वर्गीय नवणे आण्णांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी सानिका जाधव, वैष्णवी वरूटे, सानिका पाटील, अंकिता रेडेकर, मयुरी जाधव, ऋत्विक गुरव, धनंजय चौगले, सोनाली बिडकर, क्रांती जाधव, पद्मा आडेकर, ए. एस. पाटील, एन. जी. नलवडे, पी. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास वर्गक्षिक पी. एम. खंदारे, बी. एस. पाटील, जे. के. कुंडप, एन. एल. जाधव, सुभाष कांबळे, अजित खाडे, संजय पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्तिकी बागडी हिने केले. आभार पी. एम. खंदारे यांनी मानले.

Related posts: