|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » ओरिएण्टल बँकेला गंडा, काँग्रेस नेत्याच्या जावायाविरोधात गुन्हा

ओरिएण्टल बँकेला गंडा, काँग्रेस नेत्याच्या जावायाविरोधात गुन्हा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालणाऱया नीरव मोदी,मेहूल चोक्सीनंतर देशातील आणखी एका कंपनीने एका सरकारी बँकेला 17 कोटींचा चुना लावला आहे .सीबीआयने ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्सचे 17 कोटी रूपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी संभौली शुगर लि.चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक गुरमीतसिंग मान, उपसरव्यवस्थापक गुरूपालसिंग आणि अन्यविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरूपालसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे जावई आहेत. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणांवर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनूसार, उत्तर प्रदेशचे कंपनी संभौलीशुगर लि.ने 2017मध्ये 74.18 कोटी रूपयांचे नुकसान दाखवले होते. यापूर्वी डिसेंबर 2016च्या तिमाहीत कंपनीचे 18.09कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. विशेष म्हणजे ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असून देशातील सर्वांत मोठय़ा साखर उत्पादकांपैकी एक आहे. सरकारी बँकांचे कर्ज चुकावले ने गेल्यामुळे सीबीआयने कंपनीवर छापे टाकले.

 

 

 

 

Related posts: