|Saturday, January 25, 2020
You are here: Home » उद्योग » बंदर क्षेत्रातून यंदा 7 हजार कोटीचा नफा

बंदर क्षेत्रातून यंदा 7 हजार कोटीचा नफा 

नितीन गडकरी यांची माहिती  सागरमाला प्रकल्पात होणार 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

वृत्तसंस्था/ चेन्नई

देशातील प्रमुख 12 बंदरातून मिळणारा नफा चालू वर्षात 7 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. 2014 मध्ये हा नफा 3 हजार कोटी रुपये होता, अशी माहिती वाहतूक आणि शिपिंग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

2014 मध्ये या बंदरांचा कारभार हातात घेतल्यावेळी नफा 3 हजार कोटी रुपयांचा होता. 2015 मध्ये तो 4 हजार कोटी आणि 2016 मध्ये 5 हजार कोटी रुपयांवर पोहोचला. चालू वर्षात त्यात दमदार वाढ होत 7 हजार कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी बंदरांची भूमिका महत्त्वाची आहे असे त्यांनी म्हटले. आयआयटी मद्रासच्या सहकार्याने नॅशनल टेक्नोलॉजी सेन्टर फॉर फोर्ट, वॉटरवेज ऍण्ड कोस्ट्स या संस्थेच्या पायाभरणी कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

सागरमाला प्रकल्पांतर्गत पायाभूत क्षेत्रात 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. बंदरांचे आधुनिकीकरण, रेल्वे-बंदर जोडणी, रस्ते जोडणीसाठी 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी 2.80 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले.

Related posts: