|Monday, September 16, 2019
You are here: Home » उद्योग » सप्ताहारंभी सेन्सेक्सचे तिहेरी शतक

सप्ताहारंभी सेन्सेक्सचे तिहेरी शतक 

बीएसईचा सेन्सेक्स 303, एनएसईचा निफ्टी 91 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

आंतरराष्ट्रीय पातळीवरून दमदार संकेत मिळाल्याने सप्ताहाची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्सने तिहेरी शतक मारत, तर निफ्टी 1 टक्क्याने वधारत बंद झाला. दिवसातील तेजीदरम्यान निफ्टी 10,593 आणि सेन्सेक्स 34,483 पर्यंत वधारला होता.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.75 टक्क्यांनी वधारत 16,685 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.75 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.9 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

बँकिंग, धातू, वाहन, रिअल्टी, भांडवली वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू निर्देशांक वधारत बंद झाले. बँक निफ्टी 1.5 टक्क्यांनी मजबूत होत 25,688 वर बंद झाला. आयटी, औषध, पीएसयू बँक समभागात विक्री दिसून आली. शुक्रवारपासून सलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी दिसून आली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 2.24 टक्के, रिअल्टी निर्देशांक 3.13 टक्क्यांनी वधारत बंद झाले.

बीएसईचा सेन्सेक्स 303 अंशाने मजबूत होत 34,446 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 91 अंशाच्या तेजीने 10,582 वर स्थिरावला.

दिग्गज समभागांची कामगिरी

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, एल ऍण्ड टी, ऍक्सिस बँक, इन्डसइंड बँक, टाटा मोटर्स डीव्हीआर 3.5-2.8 टक्क्यांनी वधारले. सन फार्मा, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, आयटीसी 2.4-1 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात ओबेरॉय रियल्टी, रिलायन्स कम्युनिकेशन्स, टोरेन्ट पॉवर, अजंता फार्मा, एल ऍण्ड टी फायनान्स 16.2-3.7 टक्क्यांनी मजबूत झाले. एम्फेसिस, सेन्ट्रल बँक, आदित्य बिर्ला फॅशन, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया 3-1.3 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात काया, नेल्को, पूर्वांकरा, ओरिएन्ट सिमेंट, एस्ट्रल पॉली, 11.2-8.4 टक्क्यांनी मजबूत झाले. ओरिएन्टल बँक, सुप्रीम इन्फ्रा, टीजीबी, बँक्वेट्स, कॅपिटल ट्रस्ट, वक्रांगी 10-5 टक्क्यांनी घसरले.