|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इराक : तुर्कस्तानच्या 16 महिलांना मृत्युदंड

इराक : तुर्कस्तानच्या 16 महिलांना मृत्युदंड 

इस्लामिक स्टेटमध्ये सामील झाल्याने ठोठावली शिक्षा

वृत्तसंस्था/ बगदाद

इराकच्या एका न्यायालयाने तुर्कस्तानच्या 16 महिलांना दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी मृत्युदंड ठोठावण्यात आला. ऑगस्टमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम सुरू केल्यापासूनच इराकच्या सैन्याने आतापर्यंत शेकडो विदेशी महिलांना अटक करत न्यायालयात हजर केले आहे.

आतापर्यंत सुमारे 1700 विदेशी महिलांना आयएसला मदत करण्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले. संबंधित महिला दाएश (आयएस) दहशतवाद्यांशी जोडल्या गेलेल्या होत्या किंवा त्यांनी स्वतः दहशतवाद्यांशी विवाह करण्यासोबतच हल्ल्यांमध्ये मदत केल्याचे सिद्ध झाल्यानंतर केंद्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल सत्तार अल-बिर्कदार यांनी ही शिक्षा ठोठावली.

विदेशी महिला

इराक आणि सीरियामध्ये आयएसच्या उदयानंतर हजारो विदेशी नागरिक दहशतवादी होण्यासाठी या देशांमध्ये दाखल झाले होते. 2014 पासूनच अनेक विदेशी महिला देखील या संघटनेसोबत जोडल्या गेल्या. ऑगस्टमध्ये इराकच्या सैन्याच्या मोहिमेनंतर सुमारे 1300 महिलांनी स्वतःच्या मुलांसोबत शरणागती पत्करली होती. इराकने आयएसचे उच्चाटन केल्यावर आतापर्यंत सुमारे 1700 विदेशी महिलांना अटक झाली आहे. मागील आठवडय़ात देखील न्यायालयाने तुर्कस्तानच्या एका  महिलेला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. तर 10 विदेशी महिलांना आजीवन कारावास ठोठावण्यात आला होता. जानेवारीमध्ये एका जर्मन महिलेला तर डिसेंबरमध्ये एका रशियन महिलेला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

Related posts: