|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऍड इंद्रजित कांबळे महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या निवडणूक रिंगणात

ऍड इंद्रजित कांबळे महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या निवडणूक रिंगणात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महाराष्ट्र व गोवा राज्यातील बार असोसिएशन – 2018 ची निवडणूक दि.28 मार्च 2018 रोजी होत आहे. या निवडणूकीत सदस्य पदासाठी मी निवडणूक लढवत आहे, अशी माहिती ऍड. इंद्रजित आप्पासाहेब कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ऍड.कांबळे म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकरी आणि धम्म चळवळींचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आदी तत्व व विचार घेऊन सदस्य या पदासाठी निवडणूक लढवत आहे. मी यापूर्वी सांगली येथे एन.एस.लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक, कोल्हापूर येथे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून, विशेष पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र कोल्हापूर या ठिकाणी विधी अधिकारी म्हणून काम केले आहे. सर्व सामान्यांना न्यायप्रक्रियेमध्ये सन्मानाने सहभागी होता यावे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ – सर्किट बेंच प्रश्न पाठपुरावा, कृती समितीला सहकार्य, वकीलांचे वेल्फेअर आदी कामांसंदर्भात निवडूण आल्यावर आग्रही भूमिका मांडणार आहे. ही निवडणूक 25 सदस्यांसाठी होणार असून 1 लाख 22 हजार वकील मतदार यासाठी मतदान करणार आहेत. कोल्हापूर जिल्हयातून एकुण 9 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यामध्ये शिरोळ 1, हातकणंगले 2 तर शहरातून 6 उमेदवारांनी निवडणूकीसाठी अर्ज दाखल केला आहे.

पुढे ऍड.कांबळे म्हणाले, मला या निवडणूकीत भारतीय समाजवादी रिपब्लीकन पक्ष, महाराष्ट्र विकास आघाडी, भारत मुक्ती मोर्चा, भारत निर्माण परिषद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (धर्मनिरपेक्ष), बहुजन ऐक्य चळवळ, निर्मिती विचारमंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, श्रावस्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बौध्द संस्कार मंडळ, युवा आंबेडकरवादी क्रांतीदल, सम्यक प्रतिष्ठान, राजर्षी शाहू विचारमंच, महिला सन्मान फौंडेशन, मानवधिकार संघटना, बहुजन रयत विचारमंच आदी पक्ष, संघटना, संस्था आणि बहुजन समाजाने पाठींबा जाहीर केला आहे. या पत्रकार परिषदेला ऍड.प्रबुध्द कांबळे, ऍड.शरद पाटोळे, ऍड.विनयकुमार पाटील, ऍड.विजय दि†िक्षत, भक्त आर आनंद, भक्त एस.संबोधी आदी उपस्थित होते.

Related posts: