|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बेकायदा वाळू वाहतुकीसाठी तलाठय़ाने स्वीकारली लाच

बेकायदा वाळू वाहतुकीसाठी तलाठय़ाने स्वीकारली लाच 

प्रतिनिधी/ फलटण

वाळू, मुरूम, माती व्यवसाय करण्यासाठी तसेच वाळू व्यवसाय करण्यासाठी 20 हजार रूपये लाच स्वीकारल्याप्रकरणी तलाठी लक्ष्मण अहिवळे यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाने फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप त्यांना अजून अटक झाली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

  याबाबत शहर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार दि. 6 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय आवारात प्रभाकर सोपान करचे (वय 42 वर्षे रा. सोमंथळी ता. फलटण) यांना तलाठी लक्ष्मण अहिवळे याने वाळू, मुरूम, माती वाहतूक व्यवसायास मदत करण्यासाठी व वाळूची गाडी न पकडण्यासाठी 20 हजार रूपये लाच मागितली होती. तसेच ही लाच स्वीकारल्याचेही तलाठी अहिवळे याने चौकशीदरम्यान मान्य केले. दरम्यान, प्रभाकर करचे यांच्या तक्रारीवरून सर्व चौकशीअंती तलाठी लक्ष्मण अहिवळे याच्या विरुद्ध पुणे अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस निरीक्षक श्रीमती उत्तरा जाधव यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सातारा अँटी करप्शन ब्युरोचे सातारा पोलीस निरीक्षक श्रीमती ए. जे. मुल्ला करीत आहेत.

    दरम्यान, यापूर्वी दि. 6 फेब्रुवारी 2018 रोजी लक्ष्मण अहिवळे याने फलटण शहर पोलीस ठाण्यात प्रभाकर करचे याच्या विरोधात अवैध वाळू व्यवसाय सुरू राहण्यासाठी पैशाचे आमिष दाखवुन रस्ता अडवून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणले प्रकरणी फिर्याद दिली होती.

Related posts: