|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भारतीय लष्कराचे सामर्थ्य; 117 दिवसांत पूलबांधणी

भारतीय लष्कराचे सामर्थ्य; 117 दिवसांत पूलबांधणी 

परळ-एल्फिन्स्टन, करी रोड, आंबिवली स्थानकांतील पादचारी पुलांचे उद्घाटन

वर्षभरात 56 पूलबांधणी होणार, एसी लोकलची संख्या वाढविणार

मुंबई / प्रतिनिधी

कोणत्याही कामाची उरक विक्रमी गतीने पूर्ण करण्याचा शिरस्ता भारतीय लष्कराने दाखवला. परळ-एल्फिन्स्टन रोड जोडपूल, करी रोड आणि आंबिवली स्थानकांतील पादचारी पुलांच्या बांधणीचे काम लष्काराच्या जवानांनी 117 दिवसांत पूर्ण करून विक्रमी वेळेत कामगिरी केली आहे. या तिन्ही पुलांचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांनी सीएसएमटीहून परळ स्थानकादरम्यान लोकलने प्रवास केला.

गेल्या वर्षी 29 सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत 23 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर या पुलांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पुलांच्या कामांची जबाबदारी लष्काराकडे सोपवण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी लष्कराच्या कामाचे कौतुक आणि अभिनंदन केले. देशात पहिल्यांदाच लष्कराने अशाप्रकारे रेल्वेचा पादचारी पूल बांधला असल्याचे सांगत लष्कराने तो रेकॉर्डब्रेक वेळेत बांधला आहे, असे फडणवीस म्हणाले. रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसाठी 51 हजार कोटी रुपये रेल्वेमंत्रालयाने दिले असून भविष्यात लोकलचा प्रवास अधिक सुखद आणि आरामदायी होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

भारतीय लष्कराने ही तीनही पूल विक्रमी वेळेत पूर्ण केले आहेत. तसेच रेल्वेच्या यंत्रणेनेही 17 पुलांचे काम पूर्ण केले आहे. उपनगरीय मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या वर्षात 56 नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याचे यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. तसेच जूनपर्यंत आणखी पाच पुलांचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याचबरोबर एसी लोकलची संख्या वाढविण्यात येणार असून एसी लोकलमध्ये सेकंड क्लासचाही कोच असणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डा. सुभाष भामरे, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, लष्कराचे अधिकारी कर्नल विश्वंभर आदींची उपस्थिती होती.

 स्थानक           पुलाची लांबी-रुंदी (मीटर)

एल्फिन्स्टन रोड-परळ   लांबी-73.1 मीटर रुंदीö3.65 मीटर

करीरोड              लांबी-30 मीटर रुंदी -3.5 मीटर

आंबिवली            लांबी- 20 मीटर रुंदी -3.5 मीटर

Related posts: