|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना पुरस्कार जाहीर

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना पुरस्कार जाहीर 

जयसिंगपूर / प्रतिनिधी

येथील मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब जयसिंगपूर यांच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा जयसिंगपूर भूषण पुरस्कार श्री. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना जाहीर झाला. हा पुरस्कार सोहळा शनिवार 3 मार्च रोजी सायंकाळी सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाटय़गृह येथे संपन्न होणार असल्याची माहिती सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार बैठकित ट्रस्टचे अध्यक्ष विनोद चोरडिया व रोटरी अध्यक्ष भाऊसो नाईक यांनी दिली.

      पुरस्काराचे हे सोळावे वर्ष आहे. शिरोळ येथील दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व उद्यानपंडित यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा जयसिंगपूर भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी, नगराध्यक्षा डॉ. निता माने, रोटे. महेश दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त प्रवेश चोरडिया, सचिन शेडबाळे, जितेंद्र पाटील, संजय माणगांवे, अभय बनजवाडे, रवी हरळीकर, शिवराज पाटील, सुमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.