|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भीषण आगीत गाळेवजा दुकाने खाक

भीषण आगीत गाळेवजा दुकाने खाक 

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा बाजारपेठेतील तीन गाळय़ांना आग लागून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज असला तरी गाळे मालकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

सोमवारी मध्यरात्रीनंतर 1 वा. च्या सुमारास फोन आल्यावर म्हापसा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते आगीचे स्वरुप पाहिल्यावर त्वरित अन्य बंब बोलविण्यात आले. सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यास यश आले.

या आगीत गौ सुधीर आणि दादा पीर यांच्या मसाल्याच्या दुकानांना तर रामा साटेलकर यांच्या बॅगाच्या दुकानाला आग लागून दोन लाखाचे नुकसान झाले. सुनीता मसुरकर यांच्या दुकानाला आग लागून चप्पले जळून खाक झाली. त्यांचे दोन लाखाचे नुकसान झाले. एकूण तिन्ही गाळय़ांचे मिळून पाच लाखाचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी दिली.

गाळय़ांच्या बाजूला असलेल्या वीज खांबाच्या पॅनलला शॉटसर्किट होऊन या दुकानांना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बाबत म्हापसा अग्निशामक दल अहवाल तयार करून नंतर कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान म्हापसा येथील धाकूली हॉटेलला दोन वर्षापूर्वी आग लागून मोठी हानी झाली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हापशातील जुन्या सर्व वीज वाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांचे आश्वासन हवेत विरले आहे.

अनेक वीजवाहिन्या जीर्ण

म्हापशात बाजारपेठेत वीजवाहिन्या जून्या झाल्या आहेत. तसेच त्या लोंबकळत आहेत. यामुळे पुन्हा आगीची घटना घडण्याची शक्यता आहे. अभियंता म्हणून नोर्मन काम पहात असले तरी त्यांचे या गोष्टीकडे अद्याप लक्ष नसल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शिवाजी नाईक, लिडींग फायरमेन जयेश कांदोळकर, विष्णू राणे, सुरज शेटगावकर, शाहीद खान, स्वप्नेश कळंगूटकर, अक्षय सावंत यांनी ही आग आटोक्यात आणली.

बॉक्स

बार्देश तालुक्यात सध्या सुक्या गवताला आग लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या काळात अग्निशामक जवानांची बरीच धावपळ होते. अशा परिस्थितीत आगीवर नियंत्रण ठेवून आग विझविण्याचे काम जवान करीत असतात.

Related posts: