|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » कांचीपूरम पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन

कांचीपूरम पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. कांची कामकोटी पीठाचे ते 69वे शंकराचार्य होते. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याची माहिती समोर आली आहे.

जयेंद्र सरस्वती यांची जन्म 18जुलै 1935मध्ये झाला होता.ते कांचीपूरम पीठाचे69वे शंकाराचार्य होते. ते 1954मध्ये शंकराचार्य बनले होते.कांचीपूरम वरदराज पेरूमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन यांच्या हत्या प्रकरणात जयेंद्र सरस्वती आरोपी होते. मात्र न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली होती.