|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » मनोरूग्ण मुलाने केली आईची हत्या

मनोरूग्ण मुलाने केली आईची हत्या 

ऑनलाईन टीम / पुणे

पुणे जिल्हय़ातील माळवाडी येथे शुल्लक कारणावरून मुलाने आईची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीचे नाव राम बाळासाहेब दाभाडे (वय 27 वर्ष) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई मीना बाळासाहेब दाभाडे (वय 55 वर्ष) यांच्याबरोबर किरकोळ कारणावरून भांडण झाले असता, रागाच्या भरात रामने गॅस सिलेंडरची टाकी आईच्या डोक्यात टाकली. यामध्ये गंभीर जखमी होवून आई मीना यांचा मृत्यू झाला. रामवर मनोरूग्ण रूग्णालयात गेल्या तीन महिन्यापासून उपचार सुरू हेते. आठ दिवसांपूर्वीच त्याला रूग्णालयातून सोडण्यात आले होते. यावेळी घरामध्ये वडील, काका, चुलत भाऊ होते. काका शांताराम दाभाडे यांनी तळेगाव पोलिसात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास चालू आहे.

 

Related posts: