|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » चालू महिन्यात आयपीओ उभारणार 12 हजार कोटी

चालू महिन्यात आयपीओ उभारणार 12 हजार कोटी 

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू वर्षाच्या सुरुवातीला आयपीओंची संख्या कमी असली तरी चालू मार्च महिन्यात किमान सहा कंपन्यांकडून प्राथमिक समभागांची विक्री करण्यात येणार आहे. मार्चमध्ये भांडवली बाजारातून 12 हजार कोटी रुपये उभारण्यात येतील. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात 3,559 कोटी रुपयांचे सहा आयपीओ बाजारात आले होते. फेब्रुवारी महिन्यात केवळ दोन आयपीओ आले होते.

मार्च महिन्यात सरकारी मालकी आणि लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱया हिंदुस्थान एअरोनॉटिक्स, बंधन बँक आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा आरपीओ बाजारात येणार आहे. याव्यतिरिक्त सर्वेश्वर फूड्स आणि युनिइन्फो टेलीकॉम यांचेही आयपीओ बाजारात उतरण्यात येणार आहेत. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सकडूल विमानांची रचना, विकास, उत्पादन, दुरुस्ती, सुधारणा, आणि अन्य सेवा पुरविण्यात येते. 31 जुलैच्या आकडेवारीनुसार कंपनीला 63,333 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सरकार आपल्याकडील 10 टक्के हिस्सा विक्री करणार आहे, असे सांगण्यात येते.

2015 मध्ये बंधन बँकेला आरबीआयकडून परवाना देण्यात आला. आयपीओच्या माध्यमातून 4 हजार कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. 10 टक्के समभागांची विक्री करत बँकेचे बाजारमूल्य 40 हजार कोटी रुपयांवर पोहोचेल. एकूण 97.6 दशलक्ष समभागांची विक्री करण्यात येणार आहे आणि इन्टरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडील 14.05 दशलक्ष आणि आयएफसी एफआयजी इन्व्हेस्टमेंट 7.56 दशलक्ष समभागांची विक्री करणार आहे. आयसीआयसीआय समुहातील आयसीआयसीआय सिक्युरिटीज हा तिसरा आरपीओ आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या 64.42 दशलक्ष समभागांची विक्री होणार असून या माध्यमातून 4,500 कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत.