|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » एआयआयबीकडून भारतात मोठी गुंतवणूक

एआयआयबीकडून भारतात मोठी गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक क्षमतांचा लाभ घेण्यासाठी अनेक विदेशी कंपन्या देशात गुंतवणूक करत आहेत. चीनमधील एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. विभिन्न क्षेत्रात गुंतवणूक करणाऱया या बँकेने 2016 पासून भारतात गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला असून आतापर्यंत 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

नवी दिल्लीतील नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये 20 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारतात गुंतवणुकीच्या असणाऱया संधीचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न आहेत. देशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे. भारतासाठी भांडवल देण्याची चीनची तयारी आहे, असे बँकेचे अध्यक्ष जिन लिक्यून यांनी सांगितले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एआयआयबीचा प्रस्ताव मांडला होता आणि चीनमध्ये बँकेचे सर्वात मोठा हिस्सा आहे.

Related posts: