|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » होळी उत्सवास 12 ठिकाणी बंदी

होळी उत्सवास 12 ठिकाणी बंदी 

1,124 ठिकाणी साजरा होणार होळी उत्सव : पोलीस अधीक्षकांची माहिती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 जिल्हय़ात 1 मार्चपासून शिमगोत्सव सुरू होत असून सार्वजनिक व खासगी मिळून 1 हजार 124 ठिकाणी होळी साजरी करण्यात येणार आहे. मात्र 12 ठिकाणी मानपानाच्या वादामुळे होळी साजरी करण्यास बंदी घालून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

जिल्हय़ात गुरुवारपासून सुरू होणारा शिमगोत्सव दीड दिवसापासून महिनाभरापर्यंत चालणार आहे. शिमगोत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे. जिल्हय़ात 501 सार्वजनिक व 623 खासगी मिळून 1 हजार 124 ठिकाणी होळी उत्सव साजरा केला जाणार आहे.

 गावातील मानपानाच्या वादामुळे 12 ठिकाणी होळी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी, तळेखोल, कसई, उसप. सावंतवाडी तालुक्यातील कास. कुडाळ तालुक्यातील जांभवडे भुतवड, माणगाव. वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे, कुर्ली. कणकवली तालुक्यातील हुंबरठ. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे. देवगड तालुक्यातील मणचे या बारा ठिकाणचा या समावेश आहे.

 दरम्यान मानपानावरून सुरू असलेल्या वादामुळे 12 ठिकाणी बंदी घातली आहे. मात्र त्यांच्यातील वाद मिटत असतील, तर होळी साजरी करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती गेडाम यांनी दिली..

Related posts: