|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रोटरी इंटरनॅशनलचा 113 वार्धापन दिन उत्साहात

रोटरी इंटरनॅशनलचा 113 वार्धापन दिन उत्साहात 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील रोटरी इंटरनॅशनलचा 113 वा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात पार पडला. या निमित्ताने रक्तदान शिबिर पार पडले.यामध्ये 51 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. लायन्स ब्लड बँकेचे याला सहकार्य लाभले. सायकाळी संयुक्त समारंभ रोटरी क्लब, रोटरी सेंड्रल, रोटरी हेरीटेज, रोटरी टेक्स्टाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. संग्राम पाटील यांची डीजीएनडी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पीडीजी महेंद्र मुथा यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

गतवर्षी चारही क्लबला उत्कष्ठ कार्याबद्दल डिस्ट्रिक्ट ऍवॉर्ड मिळाल्याबद्दल चारही क्लबचा सत्कार करण्यात आला. तसेच मेजर डोनर झालेल्या सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रशेखर, संग्राम पाटील, अजित टारे, यांनी मनोगते व्यक्त केली.

स्वागत मनिष मुनोत यांनी केले. प्रदीप गांधी, सौ.प्रभा मर्दा, अरूण भंडारे, महेश दाते यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सागर गांधी यांनी आभार मानले.