|Monday, February 17, 2020
You are here: Home » विविधा » देशातील 20 राज्यांमध्ये भाजपची सत्ता

देशातील 20 राज्यांमध्ये भाजपची सत्ता 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांत ‘कमळ’फुलल्याने देशात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत आता त्रिपुरा व नागालँडचा समावेश झाला आहे. त्यामुळे देशातील 20 राज्यांत भाजपची सत्ता अहे. तर काँग्रेसप्रणित यूपीएकडे फक्त पाचच राज्य उरली आहते. याचाच अर्थ देशातील 67.85टक्के जनतेवर एनडीएचे राज्य आहे.

गेली 25 वर्ष डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपने मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या भाजपाने तिथे स्पष्ट बहुमत मिळवून माणिक सरकार यांच्या सरकारचे खालसा केला तर नागालँडमध्ये नव्या मित्राला सोबत घेऊन जुन्या मित्राला-नागा पीपल्स प्रंटला धूळ चारली. त्यामुळे ‘सेव्हन सास्टर्स’पैकी पाच राज्यांत आता भाजपचा झेंडा फडकत आहे. त्यामुळे देशातील एकूण 20 राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे.

 

भाजपची सत्ता असलेले 20 राज्य

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा

 

काँग्रेसची सत्ता असलेली पाच राज्य

कर्नाटक,पंजाब,मेघालय, मिझोरम,पाँडेचरी

 

अन्य पक्षांचाषटकार

पश्चिम बंगाल,तामिळनाडू,ओडिशा,तेलंगण,केरळ,दिल्ली

 

 

Related posts: