|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विजय जोशी यांचा निवडीबद्दल सत्कार

विजय जोशी यांचा निवडीबद्दल सत्कार 

प्रतिनिधी/इचलकरंजी

मुंबई येथे शिव व्यापारी सेनेच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत व्यापारी सेनेचे राज्याध्यक्ष चिंटूभाई शेख यांनी शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते व माजी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय जोशी यांची शिव व्यापारी सेनेच्या कोल्हापूर जिल्हध्यक्ष पदी व महाराष्ट्र चिटणीसपदी निवड करून त्यांना निवडीचे पत्र देवून कार्यकरणीच्यावतीने बैठकीत राज्याध्यक्ष चिंटूभाई शेख यांचा सत्कार करून भावि वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विजय जोशी हे गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवित विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करीत सदैव शिवसेना वाढीसाठी कार्यरत होते. त्यांनी अलिकडे व्यापारी सेनेची चांगली बांधणी करीत प्रत्येक क्षेत्रातील व्यापार्यांना त्यांनी व्यापारी सेनेमध्ये सामील करीत संघटनेचे जाळे सर्व दुर पसरविण्याचे काम करीत संघटना मजबूत केली. याचीच दखल घेवून त्यांची पद नियुक्ती करण्यात आली. या निवडीसाठी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेवराव गौड यांचे सहकार्य लाभले.

यावेळी कोल्हापूर जिह्यातील व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.