|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत आळय़ामिश्रित पाण्याने नगरसेवकांचा संताप

मिरजेत आळय़ामिश्रित पाण्याने नगरसेवकांचा संताप 

सांगली / प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून मिरज शहरात दूषित आणि आळयामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने सोमवारी मिरजेच्या नगरसेवक व पदाधिकाऱयांनी आयुक्तांसमोरच अधिकाऱयांना धारेवर धरले. तातडीने उपायोजना करून शुध्द पाणीपुरवठा करण्याची   मागणी केली.

मिरज शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून दूषित आळयामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना सांगूनही पाणीपुरवठा शुध्द होत नसल्याने संतापलेल्या मिरजेतील पदाधिकाऱयांसह नगरसेवकांनी सोमवारी मनपात आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची भेट घेतली.

यावेळी काँग्रेसचे गटनेते किशोरदादा जामदार, स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते, माजी सभापती नगरसेवक सुरेश अवटी, आदी नगरसेवक तसेच मिरज पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मिरजेतमध्ये दूषित आणि आळयामिश्रित पाणीपुरवठा होत असताना अधिकारी काय करतात असा सवाल करीत सभापती सातपुते, अवटी यांच्यासह उपस्थितांनी अधिकारी जाधव यांना धारेवर धरले. पाण्याच्या टाक्या तसेच शुध्दीकरण यंत्रणेची वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्यानेच पाणी बिघडले आहे.

 पाणी बदलेले जात नाही अधिकाऱयांचे लक्ष नाही अशा अधिकाऱयांवर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी केली खराब पाण्याने आजारी पडण्याची संख्या वाढत असून नागरीकांतून ओरड सुरू आहे. तातडीने उपायोजना करून शुध्द पाणीपुरवठा करावा अशीही मागणी यावेळी केली. यावेळी आयुक्त खेबुडकर यांनी शुध्द पाणीपुरवठा करण्याची संबंधित अधिकाऱयांना सुचना दिली.

मानधनावरील कर्मचारी बेपत्ता

दरम्यान, दोन वर्षापूर्वी मनपाने सांगलीसाठी 20 मिरजेसाठी 15 आणि कुपवाडसाठी पाच असे 40 कर्मचारी पाण्याच्या पाईपचे लिकेज काढण्याच्या कामासाठी मानधनावर घेण्याचा निर्णय घेतला. यापैकी सांगली वगळता कुपवाड आणि मिरजेसाठी कर्मचारी घेण्यात आले. मात्र सध्या हे कर्मचारी या कामांवर दिसत नाहीत. यामुळे लिकेजचे काम गतीने होत नाही.  अनेक कर्मचारी दुसऱयाच ठिकाणी काम करीत आहेत तर काही कामांवर येत नाहीत. मात्र त्यांचे मानधन मात्र काढले जात असल्याचे सांगण्यात आले.

 

Related posts: