|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ऐन उन्हाळयात सहा दिवस सोळा गावांचा पाणीपुरवठा होणार खंडीत

ऐन उन्हाळयात सहा दिवस सोळा गावांचा पाणीपुरवठा होणार खंडीत 

वैभव माळी/ पलूस

पलूस तालुक्यातील सोळा गावासाठी वरधान ठरणारी कुंडल योजनेस चाळीस वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने सिमेंट पाईप जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या योजनेस वारंवार गळती लागलेली असते. ऐन उन्हाळयात या योजनेस गळती लागल्याने ही योजना सहा दिवस बंद राहणार असल्याने नागरीकांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागणार आहेत. पलूस-कडेगाव मतदार संघाचे नेते जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व कुंडल चे जिल्हापरिषदेचे सदस्य शरदभाऊ लाड असे हे दोन्ही भाऊ जिल्हापरिषदेवर असताना देखील महत्वपूर्ण असा पाणी प्रश्न मिटत नसल्याची खंत येथील मतदार संघातील नागरीकांना वाटू लागली आहे.

कुंडल प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस दुधोंडीजवळ असणाऱया कृष्णा कॅनॉलजवळ पाइं&पलाईनला गळती लागल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे. योजनेची गळती काढण्याचे काम सुरू असून त्यास सुमारे सहा दिवसाचा कालावधी लागणार असल्याने पलूससह सोळा गावांचा पाणी पुरवठा ऐन उन्हाळयात खंडीत राहणार आहे. आज रंगपंचमीच्या दिवशीसुध्दा पाणी सुटणार नसल्याने बालचमुंचा हिसमुड होणार आहे. तर महिलांवर्गासह मुलांना देखील पाण्यासाठी पायी वनवन भटकंती करावी लागणार आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरीकांच्यातून होत होत्या. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने या योजनेस गळतीचेही प्रमाण वाढू लागले आहे. मागील काही महिन्यापूर्वी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देमुख यांनी येत्या उन्हाळयात आत ही योजना चांगल्या पध्दतीने दुरूस्त होईल व येथील पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगितले  होते. ही योजना दुरूस्तीसाठी सुमारे सात कोटी रूपयांचा निधीही आला असल्याची घोषणा देशमुख यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

वारंवार वीज पुरवठ खंडीत झाल्याने व गळतीचे प्रमाणात वाढ झाल्यामुण्s पलूस, रामानंदनगर, बुर्ली, सावंतपूर, दुधोंडी, या मोठया गावांना पाणीपुरवठा होत नाही. याठिकाणचे नागरीक व महिलावर्गा आड व विहीर यांचा पाणी उपसा करून तहान भागवत असताना दिसत आहेत. आड व विहीर यातील पाणी पिण्यास योग्यतेचे नसल्याने त्यांच्या आरोग्याचा देखील प्रश्न पुढे उपस्थित होणार आहे. तर काहीजण पाण्यामध्ये तुरटी टाकून पाणी पित आहेत. या गावातील मोठया शाळांतील विद्यार्थी सुध्दा या अशुध्द पाण्यांना बळी पडताना दिसून येत आहेत. यासाठी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व जिल्हापरिषदेचे सदस्य शरदभाऊ लाड या दोन्ही भाऊंनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, प्रत्यक्ष निधी आला असल्यास या कामांस प्रारंभ करावा अशी मागणी येथील लोक करू लागले आहेत.

महावितरणचे वीज बिल थकबाकीत गेल्यामुळें त्यांच्याकडून वारंवार वीज कनेक्शन तोडले जाते. दि. 15 मार्च पर्यत वीज बिल न भरल्यास आणखी काही दिवस ही योजना बंद राहण्याचे भिती निर्माण झाली आहे. वीज बिल सुमारे 28  लाख रूपयांच्या घरात आहे. त्यापैकी पलूस नगरपरिषदेने सात लाख रूपये भरल्याचे समजते. सध्या पलूस नगपरिषदेने सात लाख रूपये भरले असले तरी देखील अजूनही सुमारे एकवीस लाख रूपये भरणे आवश्यक आहे. गेल्या मंगळवारी ही योजना गळती काढण्यासाठी बंद ठेवली आहे. वीज खंडीत होत असल्याने या योजनेस गळतीचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या सुमारे सोळा गावे आहेत.

              प्रत्यक्षात कामास सुरूवात कधी

 जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पाठीमागील दोन महिन्यापूर्वी दुधोंडी येथे बैठकीत कुंडल पाणीपुरवठा योजनेस सात कोटी रूपयांचा निधी आला असल्याची घोषणा केली. लवकरच पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत व्यक्त केले होते. पण अद्याप तरी कुंडल योजनेचे प्रत्यक्षात काम सुरू झालेले दिसत नाही.

 

 

Related posts: