|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » येळ्ळूरच्या खटल्याची सुनावणी 8 रोजी

येळ्ळूरच्या खटल्याची सुनावणी 8 रोजी 

बेळगाव / प्रतिनिधी

येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटविल्यानंतर पोलिसांनी येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यावरच गुन्हे नोंदविले आहेत. त्या खटल्यांची सुनावणी न्यायालयात सुरू असून 8 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील यांनी केले आहे.

येळ्ळूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य फलकाची उभारणी गावच्या वेशीतच करण्यात आली होती. त्या विरोधात कन्नड दुराभिमान्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. त्या फलकावर भ्याड हल्लाही केला. तरीदेखील येळ्ळूरच्या स्वाभिमानी जनतेने त्या फलकाची जपणूक केली होती. जिल्हा प्रशासनाला तसेच कन्नड गुंडांना येळ्ळूरच्या जनतेने कधीच दाद दिली नाही. त्यामुळे एका कन्नड दुराभिमान्याने न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यामुळे न्यायालयाचा आधार घेत त्या फलकावर घाव घालण्यात आले. 27 जुलै 2014 रोजी घडलेल्या या घटनेनंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करण्यात आली. इतके करूनदेखील मन शांत न झालेल्या जिल्हा प्रशासनाने अनेक कार्यकर्ते व महिलांवर गुन्हे नोंदविले आहेत. या खटल्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी द्वितीय न्यायालयात सुरू आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी 8 मार्च रोजी सकाळी 10 वा. उपस्थित राहावे, असे येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे कळविण्यात आले आहे  .

 

Related posts: