|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है’; भाजपा खासदारांची घोषणाबाजी

‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है’; भाजपा खासदारांची घोषणाबाजी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. यावेळी भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहात स्वागत केले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. यावेळी संसदेत विरोधकांकडून अनेक मुद्दयांवर सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, अनेक विधेयके या अधिवेशनात मंजूरीसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत. या सगळय़ाबाबत संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी या बैठकीच्या ठिकाणी आल्यानंतर ‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है’, अशा घोषणांनी सभागृह हादरून गेले. बैठकीला सुरूवात होण्यापूर्वी खासदारांनी मोदींचे अभिनंदन केले. त्यानंतर मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.