|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » त्रिपुराच्या ‘चाणक्या’ला तेलंगणाची जबाबदारी?

त्रिपुराच्या ‘चाणक्या’ला तेलंगणाची जबाबदारी? 

भाजप नेतृत्वाकडून होतोय विचार :

वृत्तसंस्था/  हैदराबाद

 त्रिपुरात भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर आता भाजपचे सर्वोच्च नेतृत्व तेलंगणात स्वतःचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तेलंगणात होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपश्रेष्ठींनी त्रिपुरात विजयाचे शिल्पकार मानले जाणारे सुनील देवधर यांना राज्यात संघटनेची धुरा सोपविण्याची तयारी सुरू केली आहे.

त्रिपुराच्या विजयानंतर भाजप आता देवधर यांना तेलंगणता पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविणार आहे. याकरता पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडून काही संकेत देखील देण्यात आले आहेत. सुनील देवधर यांना तेलंगणाचे प्रभारीपद दिले गेले तरीही त्यांच्याकडून त्रिपुराची जबाबदारी काढून घेतली जाणार नाही. तेलंगणता भाजपचे संघटन बळकट करणे आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पक्षाच्या धोरणांच्या कुशल प्रसाराची जबाबदारी देवधर यांना सोपविण्यात येणार असल्याचे समजते.

मूळचे महाराष्ट्राचे असणारे आणि संघप्रचारक राहिलेले देवधर सध्या भाजपचे त्रिपुराचे प्रभारी आहेत. देवधर यांच्या निवडणूक व्यवस्थापनामुळे भाजपला त्रिपुरात मोठा विजय मिळाला आहे. सामाजिक अभिसरण आणि बूथस्तरीय व्यवस्थापनासाठी  ओळखले जाणारे देवधर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात मोदींच्या प्रचाराचे व्यवस्थापन पाहिले
होते.

 

 

 

Related posts: