|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मनपाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

मनपाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा 

प्रतिनिधी/ पणजी

 पणजी महानगर पालीकेची महत्वाची बैठक काल पार पडली यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पणजीतील सर्व झोपडपट्टींचा सर्व्हे करुन त्यांना तालीगाव पंचायत क्षेत्रात येणाऱया काम्राभाट येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रोजंदारीवर काम करणाऱया कर्मचाऱयांचा पगार वाढीचा निर्णय घेण्यात आला.

 मनपाचा बैठकीत काल राजीव आवास योजने अंतर्गत पणजीतील झोपट्टीRचे स्थलांतर करुन त्यांना काम्राभाट येथे पाठविण्याचे ठरविले आहे. यासाठी सर्व्हे केला जाणार आहे. त्यामुळे पणजीतील सर्व झोपडपट्टी क्षेत्र बंद होणार आहे. पणजीच्या विकासाठी मनपा प्रयत्न करत असून पणजीत झोपडपट्टी आढळू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे महापौर सुरेंद फुतार्दो यांनी सांगितले. 

रोजंदारी कामगारांच्या पगारात वाढ होणार

 मनपामध्ये सुमारे 260 कामगार हे रोजंदारीवर काम करत आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये हे कामगार काम करत आहे.  त्यांचा पगार खूप कमी आहे त्यांना प्रती दिन 500 रुपये पगार देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. तसेच इतर कंत्राटी कामगारांचा पगार वाढविला जाणार आहे. असेही यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.

व्यवसायिक परवान्यासाठी 5 हजार रुपये

 पणजीत जे डॉक्टर वकील, चार्टर एकाऊंटंट असे व्यवसायिक जे व्यावसाय करु इच्छित आहे. त्यांच्या व्यावयसायिक परवान्यासाठी पाच हजार रुपये आकारले जाणार आहे. असा निणर्य ही कालच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जे नवीन कोण sव्यवसायिक व्यावसाय करु इच्छित आहेत त्यांच्याकडून हा व्यवसायिक परवान्याचा कर gघेतला जाणार आहे. तसेच सर्व खासगी कार्यलयातील कचरा गोळा करण्यासाठी त्यांच्याकडून प्रतीमहिना 350 रुपये आकारले जाणार आहे. तसेच जे बेकायदशिर रित्या पणजीत प्रशर्दन घालणार आहे किंवा मनपाच्या परवानगीशिवाय प्रदर्शन घालणाऱयांना 50 हजार रुपये दंड प्रती दिन दिला जाणार आहे, असे मनपाचे आयुक्त अजित रॉय यांनी सांगितले.

 तसेच पणजीतील रस्त्ये खोदण्यासाठी प्रती मीटर मागे 2 हजार रुपये कर आकारला जाणार आहे. रिलायन्स टाटा या कंपन्यांकडू ही आकरणी केली जाणार आहे. तसेच सांतीनेज येथील ख्रिश्चन स्मशानभुमीचे सौंदर्यकरण करण्यासाठी गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने मंजुरी दिल्याने लवकरच या स्मशान भुमचे सौदर्यकरण होणार आहे. अन्य विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

Related posts: