|Sunday, June 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » आता युध्द अटळ म्हणत स्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल

आता युध्द अटळ म्हणत स्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल 

ऑनलाईन  टीम / मुंबई  :

  सध्या छोटा पडदा गाजवत असलेली सचिनस्वप्नील ची नंबर वन जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच लाँच झालेल्या रणांगण चित्रपटाच्या टीझरमधून आतापर्यंत सोबत असणारी ही जोडी आता एकमेकांविरोधात उभी ठाकल्याचं लक्षात येतं आहे. एवढंच नाही तर सचिनजींना पितासमान मानणाऱ्या स्वप्नीलने चक्क सचिनजींविरोधात युध्द पुकारलं आहे. या युध्दामागची कारणं काय? कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहे? आणि या रणांगणात विजयी कोण ठरणार? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं हळूहळू उलगडत जातील.

नुकताच लाँच झालेल्या टीझरमधून कैक नामी चेहरे अंधुक दिसत आहेत…. यावरूनच पुन्हा एकदा एक मल्टीस्टारर सिनेमा मराठीत येत असल्याचं आपण म्हणू शकतो. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकरांबरोबरच सुचित्रा बांदेकर, सिध्दार्थ चांदेकर, आनंद इंगळे आणि इतर कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  या कलियुगात बापमुलाला एकमेकांविरोधात उभं करणारा रणांगण हा चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.