|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » समाजातील विरोधाभास सामाजिक प्रगतीतील अडथळा

समाजातील विरोधाभास सामाजिक प्रगतीतील अडथळा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

समाजामधील आर्थिक उन्न्तीचा विरोधाभास हा सामाजिक प्रगतीमधील मुख्य अडथळा आहे. या विरोधाभासाची दरी कमी करण्यासाठी प्रयत्नपूर्वक कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले.  

शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये ‘बेटी बचाव अभियानांतर्गत’ जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.  अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के होते. संयोगिताराजे छत्रपती यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.  

डॉ. पाटील म्हणाल्या, देशाची प्रगती साध्य करण्यासाठी महिलांच्या सबलीकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिवनातील प्रतिकुल परिस्थितीमध्ये संयम वाळगण्याचे बाळकडू महिलांना मिळालेले असतात.  स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जितक्या शेतकऱयांनी जीवदान दिले त्याहीपेक्षा जास्त शेतकऱयांनी मागील दहा वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या आहेत.  काबाड कष्ट करुन मुलांच्या शिक्षणाचा आणि संसाराचा गाडा समर्थपणे हाकण्यासाठी शेतकरी महिलांची जिद्दीने धडपड चालू आहे. महिलांना समाजामध्ये लोकशाहीवादी स्थान देवून, मोकळा श्वास दिल्यास महिलांची प्रगती वेग धरेल.  देशाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागते.  जागतिक शांतता निर्माण झाल्यास तीच तरतूद वंचितांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल.  पुस्ताकांमधून, चित्रपटांमधून, टी.व्ही.वरील मालीकांमधून आत्मविश्वास मिळत नाही. तर आत्मविश्वास मिळविण्यासाठी परिस्थितीशी संयमाने सामोरे गेले पाहिजे.

श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, सशक्त समाज घडविण्यामध्ये स्त्राrयांचे फार मोठे योगदान आहे.  त्यामुळे स्त्राrयांनी स्वत:ला अबला समजू नये.  समाज बळकट करण्यासाठी विचारांची वाईट प्रवृती नष्ट केली पाहिजे. त्याची सृरुवात घरापासूनच झाली पाहिजे.

प्रास्ताविक डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले.  सूत्रसंचालन भूगोल अधिविभागाच्या डॉ. मीना पोतदार यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ.डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील आदी उपस्थित होते.