|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » ठाण्यात धडकले ‘लाल वादळ’

ठाण्यात धडकले ‘लाल वादळ’ 

ऑनलाईन टीम / मुंबई

नाशिकहून निघालेला डाव्यांच्या नेतृत्वाखालील किसान सभेचा लाँग मार्च ठाण्यात येवून धडकला आहे. कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱयांच्या मुलांना शिक्षणात सवलती द्याव्यात, अशा मागण्या घेवून हजारोंच्या संख्येने एकवटलेला हा लाँग मार्च 12 मार्चला विधीमंडळावर थकडणार आहे.

शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार असून, त्यामुळे सोमवारी मुंबईतील रस्ते जाम होणार आहेते. ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाक्मयाच्या मोकळय़ा जागेवर शनिवारी रात्री या सर्व शेतकऱयांनी विश्राम घेतला. शेकडो किलोमीटर पायी चालून आलेले हे शेतकरी मात्र थकले नव्हते. रात्री काही शेतकऱयांनी झोप काढली, तर काही शेतकऱयांनी ढोलकी, पिपाणीच्या तालावर ठेका धरला. पायात पैंजण बांधून या शेतकऱयांनी पारंपरिक नृत्य सादर केले. तसेच क्रांतिगीते, पारंपरिक गीते गाऊन क्षणभर आपला सकाळपासून आलेला शीण घालवला.

यावेळी अजित नवले म्हणाले, आमच्या आईला बापाला पिढय़ान पिढय़ा यांनी लुटले आता हे चालणार नाही, आता त्याची मुल हुंकार फोडत आहेत. या हुंकारासाठी सरकारने सज्ज रहायला हवे. हा आमचा आक्रोश घेवून उद्या आम्ही विधीमंडळावर थकडणार आहोत. अशा शब्दात त्यांनी शेतकऱयांच्या भावना व्यक्त केला.

 

Related posts: