|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधानांना कोरलेली गीता भेट देणारा तरूण अडचणीत ; बँक कर्मचारी त्रास देत असल्याचे पत्र मोदींना पाढवले

पंतप्रधानांना कोरलेली गीता भेट देणारा तरूण अडचणीत ; बँक कर्मचारी त्रास देत असल्याचे पत्र मोदींना पाढवले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदीप सोनी या कानपूरच्या तरूणाने लाकडावर कोरलेली गीता भेट दिली होती. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. तसेच बँक आपल्याला व्यवसायासाठी कर्ज देत नसल्याचेही त्याने सांगितले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर बँकेने त्याला कर्ज दिले.

असे असले तरीही या संदीप सोनी या तरूण व्यावसायिकाने आता मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. मी माझा व्यवसाय करू शकत नाही. कारण बँक कर्मचारी मला त्रास देत आहेत अशा आशयाचे पत्र संदीप सोनी याने लिहिले आहे. 2016 मध्ये मोदी यांना भेटून संदीप सोनी या सुतारकामाचा व्यवसाय करणाऱया तरूणाने लाकडावर कोरलेली गीता भेट दिली होती. संदीप सोनीला फर्निचरचे शोरूम सुरू करण्यासाठी कर्ज पाहिजे होते. मात्र ते मिळतांनाही त्याला अडचणी येत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गीता भेट दिल्यानंतर त्याचा आणि पंतप्रधानांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. आता बँक कर्मचारी त्रास देत असल्याने याच तरूणावर आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. मोदी हे लाकडावर कोरलेली गीता पाहून खुश झाले. त्यांनी त्यावेळी संदीपला 1 कोटी पर्यंतचे कर्ज दिले जावे असे जाहिर केले होते. त्यानंतर संदीपला कर्ज मिळाले. त्याने कानपूरमध्ये आपले शोरूम सुरू केले. आता बँकेचे कर्मचारी आपल्याला इतका त्रास देत आहेत की मला माझा व्यवसाय बंद करावा लागणार आहे असे पत्र संदीपने मोदींना लिहिले आहे.

संदीप अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आला असून त्याच्या घरी त्याची आई, पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. एक काळ असा होता की रोजंदारीवर मजुरी करत असे. मात्र पंतप्रधानांच्या भेटीनंतर त्याचे आयुष्य बदलले. असे असले तरीही दोनच वर्षात त्याच्यावर आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.

 

Related posts: