|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भावी आयुर्वेदाचार्य दुर्लक्षित?

भावी आयुर्वेदाचार्य दुर्लक्षित? 

पोद्दार आयुर्वेदीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे 13 दिवसांचे मुंबईतील आंदोलन पाहून सरकारचेच हसं व्हायची वेळ आली आहे. देश स्वातंत्र्यापासून सरकार कोणत्याही पक्षाचे असो भावी आयुर्वेदाचार्य नेहमी दुर्लक्षितच राहिले हीच भावना या पॅथीच्या विद्यार्थ्यांमध्ये कायम राहिली आहे. ती पुसणार कोण?

 

गम्मत आहे… ज्या ऍलोपॅथीचा पुरस्कार जगभरातून केला जातो ती पॅथी आयुर्वेदावर आधारित असल्याचे आयुर्वेद ग्रंथ सांगतात. आयुर्वेद म्हटले की पाच हजार वर्षापूर्वीचे पौराणिक ज्ञान आणि मूळ भूमी भारत असल्याचे सांगितले जाते. पण, पाच हजार वर्षाचा संदर्भ आणि भारतीय ज्ञान म्हटले की ‘गावठी’ असे हिणवण्याची प्रथा आपल्याकडेच अधिक आहे. अशा गावठी विषयाच्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन समस्या सोडवण्यास सरकार आणि संबंधित प्रशासन 13 दिवस लावते यातच आयुर्वेदाबाबतचे सरकारला असलेले ममत्व आले. आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केल्याचे अद्याप ऐकिवात नाही. पण, त्या दिवशी वरळीतील एकमेव सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी हेका करून काम बंद आंदोलनास सुरुवात केली. पहिला सोमवार असाच शांत गेला. अधिष्ठाता समस्या ऐकण्यासही आले नसल्याचे आंदोलक डॉक्टर सांगत होते. समस्या होती ती वर्गखोल्या वाढविणे, वसतिगफहात क्षमतेहून अधिक डॉक्टर, परिसरात विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चातून साजरा करावा लागणारा उत्सव वा कार्यक्रमास निधी न देणे, पॅम्पसमध्ये बाहेरील अपप्रवफत्तींचा वावर अशा बऱयाच समस्या कित्येक वर्षे त्याच स्थितीत होत्या. मात्र, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आता हॉस्टेलमध्ये राहता येणार नाही या नोटीसीने विद्यार्थ्यांमध्ये आंदोलनाची ठिणगी पेटली. यावर यापूर्वी वारंवार बोलणी, निवेदन झाल्याचे विद्यार्थी सांगतात. आंदोलनाच्या तिसऱया, पाचव्या दिवसापासून आयुर्वेदातील माजी विद्यार्थीही आयुर्वेदाकडे दुर्लक्ष होत असल्याचे धिम्या आवाजात बोलू लागले होते. आयुर्वेदिक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी यापूर्वी संघटनांकडून प्रशासनाशी बोलणी होत असत. मात्र, ही बोलणी तात्पुरत्या स्वरूपात असत आणि थोडय़ा काळात विसरलीही जात.

रा. आ. पोद्दार वैद्यक महाविद्यालय प्रशासनाने पदवीधर विद्यार्थ्यांची  प्रतिवर्ष प्रवेश करण्याची विद्यार्थ्यांची संख्या 60 वरून 100 केली. पण, या वाढलेल्या सीटसाठी कोणतीच व्यवस्था
कॉलेज प्रशासनाने केली नसल्याचे विद्यार्थी म्हणाले. विद्यार्थ्यांच्या किमान अधिकाराच्या गोष्टी देखील पूर्ण नाहीत. वर्गामध्ये बसण्याची व्यवस्था आणि वसतिगफहात राहण्याची व्यवस्था तोकडी आहे. मुलांच्या वसतिगफहामध्ये नियमानुसार 64 विद्यार्थी राहू शकतात. मात्र, इथे सध्या 136 विद्यार्थी राहतात. तरीही विद्यार्थी सहन करत होते. तीच स्थिती मुलींच्या वसतिगफहामध्ये नियमानुसार 105 विद्यार्थिनी राहू शकतात. पण, सध्या जवळजवळ 200 मुली वसतिगफहामध्ये राहत आहेत. प्रशासनाच्या नोटीसीनुसार मुलांच्या वसतिगफहातील 17 इंटर्न विद्यार्थी तर 19 इंटर्न विद्यार्थीनींना हॉस्टेल सोडण्याचे आदेश दिले गेले होते. हे जरी सोडून गेले तरीही नियमानुसार दोन्ही वसतिगफहांमध्ये दुप्पट विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहतात. तर वर्गामध्ये जास्तीत जास्त 70 ते 75 विद्यार्थी बसू शकतात. कशाच्या आधारावर महाविद्यालय प्रशासनाने वाढीव कोणतीही व्यवस्था नसतानाही 60 वरून 100 करण्याचा निर्णय घेतला. तर सीसीआयएमने कोणत्या आधारावर यासाठी परवानगी दिली? चार वर्षे उलटूनही प्रशासन अद्याप गप्प राहिल्याचे वैषम्य वाटते.

दरम्यान, अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी यांनी देखील क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असून तसा अहवालच असल्याचे सांगितले. कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल करतच त्यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याचे आदेश दिले. मात्र, विद्यार्थ्यांचे प्रश्नही तेच होते. यावर प्रशासन पर्याय का काढत नाही.

राज्यभरातील सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयांतील स्थिती अशीच आहे. मुंबईत सध्या तीन आयुर्वेदिक महाविद्यालये आहेत. यातील चर्नी रोड येथील मित्तल महाविद्यालय आणि सायन येथील आयुर्वेदिक महाविद्यालये हे सरकार एडेड आहेत. तर वरळीतील पोद्दार महाविद्यालय हे सरकारचेच आहे. त्यामुळेच सरकारी विद्यालयातील प्रातिनिधिक स्वरूपातील भावी आयुर्वेदाचार्याचे प्रश्न सर्वांसमोर आले. आयुर्वेदाचे प्रबोधन अधिक करावे, मुलांमध्ये आयुर्वेदाची आवड निर्माण करावी, असे माजी विद्यार्थी म्हणाले. आयुर्वेदशास्त्र हेच
मॉडर्न शास्त्र आहे. या शास्त्रावरच इतर
पॅथीतील उपचारांचा अभ्यास अवलंबून असल्याचे आयुर्वेदाचार्य सांगतात. आयुर्वेदाचे भारतात शिक्षण घेऊन आता जगभरात त्याचा प्रसार होत आहे. अत्याधुनिक जगात विकसित होणाऱया आयुर्वेदाचे मूळ ज्ञान भारतीयच आहे. भारतातील आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी जगभरातील वैद्यकीय विद्यार्थी भारतात येतात. त्यासाठी पोद्दार विद्यालय आघाडीवर आहे. नेपाळसारख्या देशातून भारतातील आयुर्वेद अभ्यासाला अधिक प्राधान्य दिले जाते. युरोपीय देशांतूनही भारताला आयुर्वेद शास्त्राचा गाढा अभ्यासक मानला जात आहे. मात्र, येथील आयुर्वेद शास्त्र शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील स्थिती इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच आहे. पोद्दार महाविद्यालयातील प्रश्न तडीस निघाला आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे पाहूनच पर्याय काढण्यात आले आहेत. आयुर्वेद विद्यार्थी अन् महाविद्यालयीन प्रशासनात सुसंवाद राहील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी जिंकले आहेत. कोणत्याही विद्यार्थी संघटनेला सहभागी करून न घेता पोद्दार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन यशस्वी केले आहे. त्यामुळे सरकारलाही आयुर्वेदाचार्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचा धडा मिळाला. भारतीय
पॅथीला सरकार प्रोत्साहन देत असेल तर या विषयातील विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि हक्क-अधिकाराकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे.

Related posts: