|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पुतळा रोजगार योजना

पुतळा रोजगार योजना 

गेल्या काही दिवसात रोजगाराच्या नवनवीन कल्पना उदयाला आल्या आहेत. नोकऱया मागणाऱया तरुणांना मायबाप सरकारने मध्यंतरी ठणकावले होते की कोणत्याही कामाची लाज बाळगू नये. अगदी भजी तळून विकणे हा देखील रोजगार आहे. अवश्य करावा. तरुण कोणत्याही कामाची लाज बाळगतात असे सरकारला वाटलेच कसे अशी आमची पामरांची शंका आहे. कारण असंख्य तरुण उघडय़ा डोळय़ांनी खळ्ळखटय़ाक आंदोलनात भाग घेतात. गुन्हे दाखल करून घेतात. सुखाच्या सरकारी नोकरीला मुकतात. मग नेत्याच्या सभेला किंवा मोर्चाला माणसे जमवणे, सभेत सतरंज्या उचलणे, फ्लेक्स लावणे, इतर वेळात विविध उत्सव साजरे करणे आदि रोजगार स्वीकारताना त्यांना काही वाटत नाही. ते असो.

तूर्तास एक वेगळी रोजगार योजना डोळय़ांना खुणावते आहे. ‘पुतळा रोजगार योजना’ असे तिला म्हणता येईल. सध्या पोटनिवडणुका, स्थानिक निवडणुका वगैरे चालू आहेत. कोणीतरी हरतंय आणि कोणीतरी जिंकतंय. जिंकलेले लोक हरलेल्या लोकांना आदरणीय असलेल्यांचे पुतळे नष्ट करताहेत. हबीब जालिब या कवीच्या ओळी आठवतात –

तुझ से पहले जो इक शख्स यहाँ तख्तनशीन था

उसको भी अपने खुदा होने का  इतना ही य˜ाढाrन था

(स्वैर अर्थ – तुझ्याआधी सत्ताधारी असलेल्यांना देखील आपण देवत्वाला पोचल्याचा तुझ्याप्रमाणेच भ्रम झाला होता.) तात्पर्य इतकेच की कोणाचीच सत्ता शाश्वत नाही. सबब कोणाचेच पुतळे अमर नाहीत. पुतळे उभारले जाणार आणि उखडले जाणार.

पण यातून तरुणांसाठी रोजगाराच्या मोठय़ा संधी उपलब्ध आहेत. पुतळे उखडण्यासाठी बेरोजगार तरुण जेसीबी मशीन, कुदळ, इ. घेऊ शकतात. त्यासाठी ‘ब्रेक इन इंडिया’सारखी योजना राबवून बँका अर्थसहाय्य करू शकतात.

गावोगावी माननीय नगरसेवक लोक आणि स्थानिक कंत्राटदार लोक दर वषी वॉर्डस्तरीय निधीतून फूटपाथवरचे रंगीत दगड आणि पाईपलाईन्स बदलतात. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम देखील सतत चालू असते. या कामांसाठी जे अद्भुत भारतीय तंत्रज्ञान वापरले जाते तेच तंत्रज्ञान पुतळे उभारण्यासाठी वापरले तर रोजगाराची व्याप्ती प्रचंड वाढू शकेल. पाऊस पडला की पुतळय़ांचे चौथरे झिजतील. त्यांची दुरुस्ती. पाईपलाईनप्रमाणे पुतळय़ांचे देखील स्पेअर पार्टस दर वषी मार्चमध्ये बदलता येतील. शिवाय सत्तांतर झाल्यावर पुतळे उखडले की नवीन पुतळे.