|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग » कंपनी कायदा लवादाकडे 9 हजार केसेसची सुनावणी

कंपनी कायदा लवादाकडे 9 हजार केसेसची सुनावणी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) 9 हजारपेक्षा जास्त केसेस असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. यामध्ये 2,500 पेक्षा नादारी प्रकरणांचा समावेश आहे. एनसीएलटीकडे 31 जानेवारी 2018 च्या आकडेवारीनुसार एकूण 9,073 प्रकरणांची सुनावणी चालू आहे. यामध्ये 1,630 प्रकणे विलीनीकरणासंदर्भात आहेत. 2,511 प्रकरणे नादारी आणि 4,932 प्रकरणे कंपन्या कायद्याच्या अन्य कलमानुसार सुनावणी चालू आहे, असे कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले.

कंपनी कायदा, 2013 नुसार एनसीएलटीकडे सुनावणी चालू आहे. हा कायदा व नादारी आणि दिवाळखोरी कायदा 2016 नुसार सुनावणी वेळेत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच सुनावणी होण्यासाठी ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. कंपनी व्यवहार मंत्रालय आणि तपास संस्था यांच्या चौकशीनुसार 238 कंपन्यांचा समावेश बुडीत यादीमध्ये करण्यात आला. 161 कंपन्यांचा शोध घेण्यात आला असून 77 कंपन्यांची तपासणी सुरू आहे.

Related posts: