|Thursday, September 19, 2019
You are here: Home » उद्योग » बीटी कॉटन बियाणांच्या किमतीत सरकारकडून कपात

बीटी कॉटन बियाणांच्या किमतीत सरकारकडून कपात 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सरकारने बीटी कॉटन उत्पादक शेतकऱयांना दिलासा दिला असून पाकिटाच्या किमतीत 20.4 टक्क्यांनी घट होणार आहे. 60 रुपयांनी किमती घटल्याने देशातील 80 लाख कापूस उत्पादक शेतकऱयांना याचा लाभ होईल. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे मोन्सॅटो महिको बायोटेक इंडिया लिमिटेडला दणका आहे. कंपनीच्या रॉयल्टी शुल्कामध्ये घट होणार आहे. नवीन दराप्रमाणे 450 ग्रॅम बीटी कॉटन बियाणांचे पाकिट 740 रुपयांना मिळेल. कंपनीला पूर्वी 49 रुपयांची रॉयल्टी मिळत होती, आता ती 39 रुपयांवर पोहोचली.

कापूस बियाणे नियंत्रण किंमत आदेश, 2015 नुसार केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने बियाणांच्या किमतीमध्ये कपात करण्याची सूचना  केली होती. त्यानुसार 2018-19 मध्ये देशातील सर्व बीटी कॉटन बियाणांच्या किमतीत घट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

सरकारच्या या निर्णयाचा बियाणे उत्पादक कंपन्यांना दणका बसणार आहे. किंमती कमी झाल्याने पुरवठा घटण्याची शक्यता आहे. बियाणांच्या किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांच्या संघटनेकडून करण्यात येत होती.