|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाबळेश्वरच्या डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग

महाबळेश्वरच्या डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

सातारा येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील प्रतिथयश डॉक्टरवर 354 (अ) नुसार विनयभंगाचा गुन्हा महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षातील बडे प्रस्थ असलेला डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात या घटनेची मोठी चर्चा होवू लागली आहे.

  महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये सदर

महिला व सोबत एक महिला अशा दोघी दि. 13 मार्च रोजी दुपारी 12.30

वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथे सातारा येथील राजश्री महिला विकास सामाजिक संस्थेतर्फे वर्गणी गोळा करण्यासाठी आल्या होत्या. फिर्यादी महिलेच्या

अचानक पोटात दुखू लागल्याने फिर्यादी महिला ही मरी पेट येथील

रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या शहरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. नंदकुमार भांगडिया यांच्या दवाखान्यात फिर्यादी महिला व सोबत आलेली महिला गेली होती. त्यावेळी डॉक्टर व कंपाऊंडर दवाखान्यामध्ये हजर होते. त्यांच्याशिवाय यावेळी इतर कोणीही पेशंट दवाखान्यात नव्हते. त्यावेळी फिर्यादी महिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली सोबत आलेली महिला बाहेरील बाजूस थांबली होती. डॉक्टरांनी तेथे असलेल्या कंपाउंडरला तिकीट आणायला सांगून बाहेर पाठविले व फिर्यादी महिलेस आतमधील स्वतंत्र केबिनमध्ये तपासणी करीत असताना अश्लिल हावभाव करत फिर्यादी महिलेच्या अंगावरून हात फिरविला. त्यानंतर डॉक्टरांनी कागदावर औषधे लिहून दिली व पैसे देत असताना त्यांनी पैसे घेतले नाहीत.

त्यानंतर फिर्यादी महिलेने घडलेला प्रकार बाहेर आल्यावर सोबत असलेल्या महिलेस सांगितला. याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. भांगडीया यांच्याविरोधात पोलिसांनी 354 (अ) नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीता डोईफोडे तपा स करित आहेत.