|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला

मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे एकबोटे यांना कोणत्याही क्षणी  अटकेची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मिलिंद एकबोटे हे स्वतःहून पुण्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. तसेच एकबोटेंच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारची बनवाबनवी सुप्रीम कोर्टात उघड झाली होती. एकबोटेना आतार्पंत का अटक केली नाही, या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने हास्यास्पद उत्तर दिले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत सुप्रिम कोर्टाने एकबोटेंचा जामीन अर्जन फेटाळला.

 

 

 

 

Related posts: