|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे-नारायण राणे

नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे-नारायण राणे 

ऑनलाईन टीम / मुंबई

आझाद मैदानावर नाणार प्रकल्प विरोधांनी मोर्चा काढला असून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भेट घेतली. यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, असे ते म्हणाले.

शिवसेना नाणार प्रकल्पाबाबत डबल गेम खेळतेय. नाणार प्रकल्पाला मंजूरी देणारे तेच आणि विरोध करणारेही तेच आहेत. मी माझ्या पक्षाचे काय करणार ते येत्या आठ दिवसामध्ये समजेलच. मी बघतो काय करायचे ते, शिवसेनेला काळजी करण्याची गरज नाही. नाणारच्या बाबत मुख्यमंत्री माझे ऐकतात की शिवसेनेचे ऐकतात ते तुम्हीच बघा, राज्यसभेवर जाण्याबाबत मी विधानसभेच्या आवारात बोलत आहे. असे ते म्हणाले.

नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी उमेवारी अर्ज भरला आहे. पण आता याच मुद्यावरून शिवसेना हे नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपकडून देण्यात आलेल्या नारायण राणे यांच्या राज्यसभा उमेदवारीबद्दल शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत ?, राणेंनी ते अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे का ?, भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याची पावती राणे यांच्याकडे आहे का ?, राणे यांना सदस्यत्व दिले नसेल तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी कशी दिली ?, असे प्रश्न शिवसेना विधान परिषद गटनेते अनिल परब यांनी विचारले आहेत.

 

 

Related posts: